उद्धव ठाकरे यांच्याबरोबर अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते एकनिष्ठतेने राहिलेले आहेत. त्याची काळजी शिंदे गटाने करू नये, येणार्या काळात शिंदे गटाची काय अवस्था होणार हे त्यांनी पहावे, असा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे. पत्रकारांशी ते आज बोलत होते.