जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आज पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी प्रास्ताविकामध्ये अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली