कळमना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शाशिकांत मुसळे यांनी 8 ऑक्टोबरला दुपारी पाच वाजता दिलेल्या माहितीनुसार गर्लफ्रेंड चे खर्च भागवण्यासाठी व जुगार खेळण्यासाठी कळमना मार्केट मधून दुचाकी चोरी करणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याला कळमना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आल्याआहे. या प्रकरणाच्या पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे यांनी दिली आहे.