अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी सेलू पोलिसांनी शनिवारी (ता. ३०) सकाळी आकोली व केळझर शिवारात मोठी वॉशआउट मोहीम राबवली. सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत तब्बल ६ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.