स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत दारव्हा नगर परिषदेतर्फे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी दि. २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पर्यंत पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. "एकच लक्ष्य – शहर स्वच्छ" या घोषवाक्यासह नागरिकांमध्ये पर्यावरण जाणीव निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.