धुळे जिल्ह्यात शिवशाही ई-वातानुकूलित बससेवा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या धुळे शाखेतर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत या सेवा असूनही धुळे मात्र वंचित असल्याचा सवाल संस्थेने उपस्थित केला. शहराध्यक्ष मोहन येवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय अधिकारी प्रवीण पाटील यांना निवेदन दिले. या सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास, आगाराच्या उत्पन्नात वाढ व व्यापाऱ्यांना सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.