अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील माहेरवाशीनीचा सासरी खेतीया येथे दोन लाख रुपयांसाठी तिच्या मुलांना हिसकावून तिला घरातून हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.