आपल्याला नम्र करणे, आपला अहंकार तोडणे, वैराग्य आणि विश्रांती देणे, विकास घडविणे आणि विश्वास वाढविणे हे केवळ गुरूमुळे होऊ शकते. त्यामुळेच गुरू म्हणजे आत्म्याचा दीप, असे चिंतामणी बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित रामकथा सोहळ्यात मोरारी बापू यांनी सांगितले. रामकथा पर्वाच्या पाचव्या दिवशी त्यांनी गुरू आणि शिष्याचे नाते यावर मार्गदर्शन केले.