विज्ञान युगात मातीशी जोडलेली शारीरिक खेळ लुप्त होत आहेत. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी ऍड देवदास वैरागडे यांनी ४५ वर्षापासून स्वतः शेकडो वर्षाची परंपरा जोपासली असून यावर्षी देखील चिचाळ येथे कुस्तीची दंगल भरविली होती. या स्पर्धेत भंडारा, रामटेक, गुंथारा, खमारी, कोंढा, निमगाव, पाथरी व चिचाळ येथील ४४ कुस्तीपटूंनी सहभाग दर्शविला होता. विशेष म्हणजे ४५ वर्षाच्या कालावधीत यावर्षी पहिल्यांदाच भंडारा येथील युवती सोनल पंचबुद्धे या खेळपट्टीने कुस्तीच्या या दंगलीत सहभाग दर्शविला होता.