कोतवाली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी 31 ऑगस्टला रात्री सात वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे गणेश पेठ हद्दीत एका विहिरीमध्ये हाडांचा सांगाडा सापडला होता. हा सांगाडा पुरुष जातीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गणेश पेठ पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांनी दिली आहे.