राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा, असेही जरांगे यांनी म्हटले. शिंदे समितीने दस्तावेज शोधणे गरजेचे आहे. सर्व आंदोलकांनी नियमांचे पालन करा, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.