गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात ठीक ठिकाणी गणेश मूर्तींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानुसार पुढील 10 दिवस सकाळ सायंकाळ मोठ्या हर्षोल्हासात आरती केली जाते तर दुपारी व रात्रीच्या सुमारास बालकांसह नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गणेशपुर येथील गणेशपुर चा राजा श्री गणरायाच्या आरतीचा मान भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांना मिळाला.