सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जीआर काढला असून यामुळे ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. कुणबी सेनेच्या वतीने विक्रमगड येथे मराठा समाजाबाबत सरकारने काढलेल्या जीआरची होळीकरण्यात आली. सरकारने कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. जीआरची होळी करत यावेळी सरकारच्या निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.