नवेगावबांध गावाबाहेरील कोहमारा अर्जुनी/मोरगाव राज्य महामार्गावर देवलगाव शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलला मागून येत असलेल्या अॅम्बुलन्सने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात येथील २५ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तर एक जखमी झाला. मृतक नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक एक मधील रहिवासी असून तारेश मनोहर सांगोळकर (वय २५ वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. अनिल मेश्राम असे जखमीचे नाव आहे.