माझ्यावर आरोप केले आहे त्यांना कायदेशीरदृष्ट्या उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, कुर्डू गावचे माजी सरपंच अण्णा ढोणे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर आरोप केले असून 15 ते 16 खून करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर खासदार मोहिते पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.