विठ्ठल कारखान्याला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या किरण घोडके याला जामीन मंजूर झाला असल्याची माहिती एडवोकेट अतुल आर पाटील यांनी दिली आहे. आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली आहे. पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.