राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक विष्णू माने यांची प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली आहे .मुंबईत झालेल्या या कार्यक्रमास आमदार शिवाजीराव गरजे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी सांगली विधानसभा अध्यक्ष बीरेंद्र थोरात सागर शिनगारे आधी उपस्थित होते .ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विष्णू माने यांची निवड करण्यात आली आहे .