पो. स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर येथील मंजुश्री बुद्ध विहाराच्या मागे शेतात ओलितासाठी जवळच असलेल्या मामा तलावातून सिंचनासाठी पाणी घेण्यास विद्युत मोटर पंप सुरु करीत असताना विजेचा धक्का लागून एका 65 वर्षीय शेतमजुराचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 28 ऑगस्टला घडली. ही घटना सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान शेतमालकाच्या लक्षात आली. मृतकाचे नाव सदाशिव सदू बंधाटे वय 65 वर्ष रा. हमलापुरी असे असून तो श्री.चक्रवर्ती मनसर यांचे शेतात शेतीची कामे करायचा.