शहरातील कॉटन ग्रीन कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावून पलायन केले. ही घटना ८ सप्टेंबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुकेश हा ७ सप्टेंबरच्या रात्री आपल्या मित्रांसह फ्लॅटवर होता. थोड्या वेळाने त्याचे मित्र बाजारात गेले असता सुकेश झोपला. मित्र परत आले तेव्हा दरवाज्याला बाहेरून कुलूप लावलेले दिसले. त्यांनी सुकेशला फोन करून विचारले अस