धुळे शहरातील ऐतिहासिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाचकंदील परिसरातील महापालिका मालकीच्या चारही मार्केटचे लवकरच नूतनीकरण करण्यात येणार आहे. या मार्केटची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांना आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली.