भाकप गोदिया जिल्हा कौन्सिलची सभा दि.25 ऑगस्टला काॅ.शेखर कनोजिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.काॅ मिलिंद गणवीर जिल्हा सचिव यांनी जिल्हा सभेची रूपरेखा, विषय सुची मांडली.प्रथम भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी महासचिव काॅ.एस सुधाकर रेड्डी यांच्या निधना वर शोक व्यक्त करण्यात आले.तसेच प्रभा सादु यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.भाकप राष्ट्रीय परिषद सदस्य व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे जनरल सेक्रेटरी काॅ शिवकुमार गणविर,शेखर कनोजिया,हौसलाल रहांगडाले आदी उपस्थित होते.