कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील झोपडपट्टी व मातंगवाडा भागात आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 11 वाजेच्या सुमारास अतिवृष्टी होऊन अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने ,गोरगरिबांच्या घरात चुली पेटले नव्हत्या,ही माहिती आमदार संतोष बांगर यांनी जाणून घेतल्यानंतर त्यांनी सदर कुटुंबीयांना किराणा साहित्य आणि आर्थिक मदत केली असल्याची माहिती आज दुपारी प्राप्त झाली आहे .