आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या सुमारास उपवन परिसरात श्वानप्रेमींनी दिल्ली कोर्टाच्या निर्णयाविरोधात रॅली काढली आहे. दिल्ली कोर्टाने अलीकडेच सार्वजनिक ठिकाणी भटक्या श्वानांना खाऊ घालण्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात येथे विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो श्वानप्रेमी सहभागी झाले होते.