राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासनं आणि त्या आश्वासनांची पूर्तता यावर चर्चा करण्यात आली.