मिरा भाईंदर महानगरपालिका फक्त तंतोतंत कोर्टाचे आदेश पाळते. हिंदू सण आले की कोर्टाचे आदेश येतात, बाकी वेळ अनधिकृत बांधकाम असेल, रस्ते, टेंडर, फेरीवाले बसवणे असतील त्यावेळी कोर्टाचा अपमान होत नाही. आमचे हिंदू सण आले की कोर्टाचा अवमान होतो. हे हिंदू विरोधी सरकार आहे, ते फक्त दाखवते आम्ही कट्टर हिंदू आहोत. बाकी कामे तर जिहादी पेक्षा वाईट करतात अशा शब्दात मनसेचे मिरा भाईंदर विधानभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास टीका केली आहे.