रामटेक तालुक्यातील ग्रा.पं. उमरी येथील शुक्रवार दि. 22 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आयोजित ग्रामसभेसंबंधी काही ग्रामस्थ व सरपंच, प्रशासन यांचा विवाद समोर आला आहे. 10 वाजता तहकूब सभेच्या ठिकाणी ग्रा.पं. कार्यालयात सरपंच व कर्मचारी होते. सचिव नव्हते. तर 10.30 वाजता पोहोचलेल्या काहींनी सांगितले कार्यालयाला कुलूप होते. मात्र सरपंच व सचिवाने ही तहकूब सभा झाल्याचे सांगितले. यावेळी सचिव ऑनलाईन असल्याचेही सांगितले. बीडीओ जाधव यांनी सोमवारी या संबंधी स्वतः जाऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले.