10 सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे जरीपटका अंतर्गत येणाऱ्या कडबी चौका जवळ व्यापारी राजू दिपानी यांच्यावर अज्ञात आरोपींनी गोळी झाडून त्यांच्याजवळ असलेली लाखो रुपयांची रक्कम लुटून नेल्याची खळबळजणक घटना घडलेली आहे. दरम्यान त्यांना गोळी लागल्यानंतर चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतो आहे ज्यामध्ये त्यांना पाठीत गोळी लागल्याचे दिसत आहे. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी त्यांनी जखमेच्या ठिकाणी हात देखील लावलेला आहे.