8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोहरा येथे एक अपघात झाला. या अपघातात 55 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. त्यांना उपचारासाठी पोहरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलविण्यात आले. भंडारा येथे उपचारासाठी नेले असता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात मृत घोषित केले. ही घटना 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. ममता वसंता वडेकर (55) रा पेंढरी मोठी असे घटनेतील मृतक महिलेचे नाव आहे.