भुसावळ तालुक्यातील वराडसीम गावात गेली साडेचारशे वर्षांपासून अनोख्या पद्धतीने बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे. हा सण केवळ बैलांची मिरवणूक काढून साजरा न करता, एक विशेष 'पोळा फोडण्याच्या' स्पर्धेने साजरा केला जातो. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण पोळा म्हणून ओळखला जातो. त्याच पध्दतीने शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता अनोखा पोळा साजरा करण्यात आला.