महामेट्रोने कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर पुलाची निर्मिती केली असून या डबल डेकर पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद घेतली आहे. जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.