नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर गावात १७ ऑगस्ट रोजी सकाळी सतत होणाऱ्या सासरच्या जाचाला कंटाळून २६ वर्षीय विवाहिता महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी दुपारी तालुका पोलीस ठाण्यात समशेरपुर येथील सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.