भामरागड तालुक्यात मागील २ दिवसापासून होत असलेला मुसळदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सोमवार ला कोडपे गावातील तरुण खंडी गावात कामानिमित्त गेला असता वापस परत आपल्या स्वगावी येत असताना गावा अगोदर नाला आहे. ते तुडुंब पाण्याने वाहून जात होता. युवक नामें लालचंद कपिलसाय लाकडा १९ वर्ष सायंकाळच्या सुमारास खंडी नाला पार करत असतांना पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे वाहून गेला होता.