राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय,गोंदिया येथील समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिची गोंदिया पोलीस मुख्यालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन,कायदा व सुव्यवस्था,आणि सामाजिक न्याय याविषयी प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा होता. मुख्यालय प्रभारी आर.पी.आय.राजेश सरोदे सर यांनी विद्यार्थिना पोलीस विभागातील विविध शाखांची माहिती दिली. गुन्हे अन्वेषण, सायबर क्राईम, महिला सुरक्षा, नियंत्रण कक्ष आदी विभागाची माहिती देण्यात आली.