कळंब येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट नकाशा आणि खोटे दस्तऐवज तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी खुद्द सह दुय्यम निबंधक ईश्वर नरसाळे यांनीच फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता. अशी माहिती कळंबक्षपोलिसांच्या वतीने चार सप्टेंबर रोजी सहा वाजता देण्यात आली.