कला वाणिज्य कॉलेज येथे मराठा समाजाची बैठक बुधवारी दुपारी ३ वाजता पार पडली. त्या बैठकीत राज्याचे बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे यांचा मराठा आरक्षण मिळवून देण्यात मोलाचा वाटा असल्याने त्याचा भव्य स्वागत सोहळा गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ येथे करण्यात आलेला असून मराठा बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.