Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
छत्रपती संभाजीनगर : सीएच शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणाने काकाच्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न फसल्याने चक्क गॅस सिलेंडर मध्ये कात्री खूपसून स्पोट घडवून आणला. गॅस स्पोटमध्ये भाजून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना बुधवारी संध्याकाळी जवाहर नगर परिसरातील न्यू शांतीनिकेतन कॉलनीमध्ये घडली. यामध्ये घराचा देखील नुकसान झाला आहे.