नंदुरबार शहरातील श्रीमंत दादा गणपती मंडळाची आज सकाळी नऊ वाजेपासून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांनी मंडळात येऊन बाप्पाचे दर्शन घेतले व रथ ओढून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. लेझीम पथकात लोकप्रतिनिधी यांचा सहभाग होता.