गेल्या अनेक महिन्यापासून जालना शहरातील सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत नागरीक शहराला स्वच्छ करण्यासाठी धडपड करीत असतांना एका जबाबदार असलेल्या डॉक्टरनेच बेजबादारपणे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकून स्वतःचा अपमान करुन घेतला आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर त्या डॉक्टरला जालना शहर महानगरपालिकेने चक्क 5 हजार रुपयाचा दंड ठोठावला असल्याची माहिती सोमवार दि.1 सप्टेंबर 2025 रोजी दु. 4.30 वाजता सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी दिली. जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने कारवाई केली.