सातपाटी आणि शिरगाव समुद्रकिनाऱ्या नजीक समुद्रातून वाहून आलेले तीन कंटेनर आढळून आले आहेत. समुद्रकिनाऱ्या नजीक खडकाळ भागात हे कंटेनर आढळून आले असून याबाबतची माहिती स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना दिली. सातपाटी येथे दोन व शिरगाव येथे एक असे एकूण तीन कंटेनर आढळून आले आहेत. कंटेनर नेमके आले कुठून यात काय आहे याबाबतचा तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरु आहे.