शक्तिपीठ महामार्गाचा प्रस्तावित मार्ग चंदगड तालुक्यातून जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज शुक्रवार 11 जुलै दुपारी तीन वाजता ऍडव्होकेट संतोष मळवीकर व शेतकऱ्यांनी तहसीलदारांनी निवेदन दिले.