आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर तुषार हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्षात खळबळ उडवून दिली आहे.अवघ्या काही तासांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या जम्बो कार्यकारिणीत फूट पडल्याची ही घटना आहे.