शहरातील छोटा बाजार परिसरात परक्या दाम्पत्याने एका घराचा कोंडा तोडून बळजबरीने वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ते 28 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेपर्यंत घडली. फिर्यादी प्रविण काशीनाथ पाटील (वय 42, रा. छोटा बाजार, हनीस सेठ चाळ, परतवाडा) यांना त्यांच्या मित्राने फोन करून कळविले की त्यांच्या घरात कोणी तरी राहत आहे. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा भाऊ घरी परतले असता, घरात एक महिला व एक पुरुष राहत असल्याचे आढळले. त्यांनी विच