शहरातील जिंतूर रस्ता परिसरातील दत्तनगर येथे शुक्रवार दि.२२ रोजी पहाटे दोनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.