गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सोमवार दि.25 ऑगस्ट रोजी, सायंकाळी 5 वाजता, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांसह, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा झाल्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.दरम्यान, लक्ष्मण हाके गेवराई शहरात आल्यानंतरच हा प्रकार घडला.पोलीस घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.