आज दि सव्विस ऑगस्ट रोजी सांय पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नड तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येच्या घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. हतनूर येथे राणी ऊर्फ विमल ज्ञानेश्वर अकोलकर (३०) यांनी घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. दुसऱ्या घटनेत भिलदरी तांडा येथे शेतकरी राजू राठोड यांच्या पत्नी साक्रीबाई राठोड (४५) यांनीही दुपारी गळफास घेतला.