शरद पवारांनी घडते दुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे शक्य आहे असे विचार मांडले होते. यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली असून शरद पवारांनी सत्तेत असतानाच मराठा आरक्षणासाठी काम केले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया आज रविवार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीत जास्त काम केले असल्याचे सांगितले.