काही दिवसांपूर्वी दारव्हा येथे चार लहान मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या वेळी नागरिकांनी फोन करून मदत मागवूनही कोणत्याही प्रकारची अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध झाली नाही, ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. या पार्श्वभूमीवर व मृत मुलांच्या घरी खासदार संजय देशमुख यांनी भेट देऊन सांत्वन केल्यानंतर नातेवाईकांनी खासदार देशमुख यांना माहिती दिली आणि या आगोदर ही उपजिल्हा रुग्णालयातूनही फोन द्वारे व लेखीस्वरूपात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.