शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी रविवारी सकाळी ११ च्या सुमारास निवडणूक आयोग आणि एसआयआर विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, बिहारसारख्या राज्यात लाखो नव्हे तर कोट्यवधी मतदारांची नावे मतदार यादीतून चुकीच्या पद्धतीने काढून टाकली जात आहेत. हा एक गंभीर मुद्दा असून, बिहारमधील राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा राज्यभर परिणाम झाला आहे, त्यामुळे अशा बैठका सुरूच राहतील.