आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3:30वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील सिपोरा बोरगाव येथे भोकरदन जाफराबाद या मुख्य रोडवर शिपोरा बोरगाव गावाखेडी असलेल्या विहिरीत उडी घेऊन एका बावीस वर्षीय तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे यामध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव तोफिक शकील मिर्झा वय 22 वर्षे राहणार बदनापूर असे आहे सदर घटनेची माहिती अग्निशमन विभाग भोकरदन यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी येत मृतदेह वर काढला असून सदर घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात घेण्यात आली.