सातारा शहरातील, जून महिन्यामध्ये, डिफेन्स कॉलनी, विकास नगर, सातारा येथे एका घरातील कपाटातून दागिने चोरी झाली होती, या संदर्भात सातारा शहर डी.बी. पथकाने एका संशयित आरोपीला एमआयडीसी परिसरामध्ये, सापळा रचून ताब्यात घेतले, त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर चोरी केल्याची कबुली दिली, तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले 18 तोळे सोन्याचे दागिने, या दागिन्याची एकूण रक्कम 18 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आरिफेकडून हस्तगत केला असून, सदर आरोपीवर यापूर्वी चोरी, घरफोडीचे 13 गुन्हे दाखल आहेत.